योगेश च्या मनातलं काही....
"चांद" ---------------------------------- आपणच आपल्या मनाला सावरायचं असत कोणामध्ये किती गुंतायच हे पहिलच ठरवायचं असत मी मला सावरायचं खूपस ठरवलं होत ठरवलं कितीही तरी झाल तेच जे व्हायच होत माझ्या बरोबर निसर्गाला हि नवी पालवी फुटत होती माझ्या आयुष्यात प्रेमाची एक सर आली होती ती होती तेंव्हा कशाचाच विचार नव्हता पान फुल सोडा ढगांमध्ये तिचा चेहरा होता तिला चोरून पाहणं नित्य नवा अनुभव होता तिचा एक कटाक्ष हि माझ्या साठी मोठा होता क्षितिजांच्या आभाळात चांदण्या चा साज होता तिची चंदेरी टिकली उगवतीचा चांद होता अचानक माझ्या चंद्राला कुणाचतरी ग्रहण लागलं न उमगण्या सारखा काही तरी कारण झालं स्वप्नामधल घर स्वप्नातच उरलं डोळ्यातल्या आसवांना मी पापण्यात अलगद धरलं ----------------------------------- "अचानक" -------------------------- एक दिवस अचानक तिची माझी भेट झाली !! मला पाहून तीही क्षणभर थांबली ,,, शब्द ओठांकडे आणि भावना डोळ्यांकडे पळाल्या ,,,, समाजाच्या भीतीने मी त्यांना वेळीच आवरल्या,,,, तीला मात्र फक्त शब्दांनाच थांबवता आल......... भावनांच्या पुराने डोळ्यात पाणी भरून आल .... --...