"आनंदयात्री"

२५\०९\२०१८ आतुरतेने वाट बघितला जाणारा आजचा दिवस , ...म्हणजे स्वतःचाच वाढदिवस !! आयुष्यात बघितलेल्या पावसाळ्यांचा हिशेब वगैरे सांगणारा दिवस. कायमच थोडा तिरकस वाटणारा ३६ चा आकडा पार करताना आज तो तितका तिरका वाटत नाही. अचानक सोडून गेलेली वडीलधारी माणसं या वाढदिवसाला नाहीत,आणि यापुढे पण कधीच नसणारेत ही जाणीव ,कातरवेळ हा शब्द अधोरेखित करत राहते. पण अंतरवर्तुळातली नाती फार काळ दुःखाला ही टीकू देत नाहीत. भेटायचं ठरतं आणि पडत्या फळाची आज्ञा मानून आपण ठरलेल्या वेळेत नियोजित ठिकाणी हजर (ता.क.: ठरलेल्या वेळेत पोचणं आता तितकंसं फॅशनेबल नाही राहिलं..माझ्यासारखंच ) जंगली महाराज रस्त्यावर आता पहिल्या सारख्या दुतर्फा गाड्या पळत नाहीत एका बाजूला प्रशस्त (पुण्याच्या मानाने ) म्हणावा असा मोठ्या मोठ्या आकाशचिन्हानी उजळलेला पदपथ , आणि त्याला लागूनच काळाच्या ओघात घट्ट मुळं रोवून वाकलेली पण उभी राहिलेली दिमाखदार झाडं . जुने वाडे आणि पुसट झालेल्या पुणेरी पाट्या , तर दुसऱ्या बाजूला डागडुजी करून चमकवलेलं संभाजी उद्यान !! शिवसागर हॉटेल ची पडवी वजा ओसरी , रस्त्यात बसलोय कि आत बसलोय प्...