योगेश च्या मनातलं काही....
"चांद"
----------------------------------
आपणच आपल्या मनाला सावरायचं असत
कोणामध्ये किती गुंतायच हे पहिलच ठरवायचं असत
मी मला सावरायचं खूपस ठरवलं होत
ठरवलं कितीही तरी झाल तेच जे व्हायच होत
माझ्या बरोबर निसर्गाला हि नवी पालवी फुटत होती
माझ्या आयुष्यात प्रेमाची एक सर आली होती
ती होती तेंव्हा कशाचाच विचार नव्हता
पान फुल सोडा ढगांमध्ये तिचा चेहरा होता
तिला चोरून पाहणं नित्य नवा अनुभव होता
तिचा एक कटाक्ष हि माझ्या साठी मोठा होता
क्षितिजांच्या आभाळात चांदण्या चा साज होता
तिची चंदेरी टिकली उगवतीचा चांद होता
अचानक माझ्या चंद्राला कुणाचतरी ग्रहण लागलं
न उमगण्या सारखा काही तरी कारण झालं
स्वप्नामधल घर स्वप्नातच उरलं
डोळ्यातल्या आसवांना मी पापण्यात अलगद धरलं
-----------------------------------
"अचानक"
--------------------------
एक दिवस अचानक तिची माझी भेट झाली !!
मला पाहून तीही क्षणभर थांबली ,,,
शब्द ओठांकडे आणि भावना डोळ्यांकडे पळाल्या ,,,,
समाजाच्या भीतीने मी त्यांना वेळीच आवरल्या,,,,
तीला मात्र फक्त शब्दांनाच थांबवता आल.........
भावनांच्या पुराने डोळ्यात पाणी भरून आल ....
-----------------------------------
"आधार "
-----------------------------------
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माणसाला गरज असते आधाराची
जन्माला येण्यापूर्वी आईच्या उदराची
जन्माला आल्यानंतर आईच्या पदराची
चालायला शिकताना कोणाच्या तरी बोटाची
चालायला लागल्यावर मार्ग दाखवणाऱ्या हातांची
शाळेत जायला लागल्यावर चांगल्या मित्रांची
शाळा संपल्यावर प्रत्येक वळणावर साथ देणाऱ्या जोडीदाराची
हे सगळ चुकल तरी शेवटी बरोबर नेणाऱ्या काळाची
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माणसाला गरज असते आधाराची !!
----------------------------------
"स्वप्न-क्षितीज"
----------------------------------
बरेच दिवस झाले तिची माझी भेट नाही
स्वप्नात होत असली तरी प्रत्यक्षात मात्र नाही....
स्वप्नांमध्ये काय ती मला रोजच भेटते,,,,
चुकून डोळे मिटले तरी समोर तीच दिसते
स्वप्ना मध्ये आम्ही भविष्याची स्वप्ने पाहतो
हातात हात घालून क्षितिजा पर्यंत चालत जातो .....
चालता चालता ती मधेच थोडी थांबते
"दमले" म्हणून खांद्यावर हळूच डोकं ठेवते!!!!
तिचा केसांमधून वारा जेंव्हा वाहतो
तो क्षण पाहायला निसर्ग हि थोडा थांबतो
थांबल्याला त्या क्षणाला मी मनात साठून घेतो
अन त्या नंतरचा प्रत्येक क्षण त्याचाच सोबत जगतो !!!
तिच्या सोबत प्रत्येक रात्र पौर्णिमा असते
तिची चंदेरी टिकली चंद्रम्याला हि लाजवते
रात्रीचा चंद्र दिवसा उजेडी दिसत नाही
स्वप्नांमधली ती प्रत्यक्षात मात्र कधीच आणि कधीच दिसत नाही........!!!!
----------------------------------
"अभियंता"
-----------------------------------
submission जरा जास्त आहे असा दरवर्षी च वाटत
एरवी रिकाम्या bag मध्ये files चं ओझं वाढत !!
तरी हात लिहित राहतात डोक्यात काही शिरत नाही
स्वप्नांमध्ये "sheets" शिवाय दुसर काहीच दिसत नाही!
तितक्यात "submission" ची "last date declare" होते
एकानेच काढलेल्या sheet ची सगळ्यांसाठी GT होते,,,,
दिवस एक एक करून निघून जातात
त्याला तिला भेटायच्या सगळ्या वेळा टळून जातात !!!
submission संपून PL चा सुरु होतो पुन्हा खेळ
हा हा म्हणता चालत येते examination ची मरण वेळ !!
चक्क डोळ्यां समोर केस डोक सोडून निघून जातात
चष्मा आणि टक्कल घेऊन Engineers बाहेर पडतात...!!!
-----------------------------------
"मी कोण"
-----------------------------------
मी दिसतो तसा नाही मी वागतो तसाही नाही
जी जसा आहे तसा हि नाही
मला समजला हि कोणी नाही
कुणी तरी समजून घ्यायला हव असहि कोणी नाही
नाहीतरी अस समजावण्यात काही अर्थ नाही
अर्थ नसला तरी अर्थ काढणारा कुणी नाही
न समजायला मी काय समुद्राची खोली नाही
मोजता न येणार क्षितिजावरच अंतर नाही
कधीहि न संपणारी काळरात्र नाही
मी असा का आहे हे माझ मला माहित नाही
मी कोण आहे हे सांगणारा ही कुणी नाही
या जगा वेगळ्या विश्वात माझ्या सारखा कोणीच नाही !!
--------------------------------------------
"बघ अभ्यासाची आठवण येते का !!!"
-------------------------------------------
semister चा लागलेला result मित्रांकडून ऐक ...
तुही घे ....एक दोन down असतीलच .....
बघ अभ्यासाची आठवण येते का
मग सरळ घरी जा, घरी सगळे असतील
कोणाला काही बोलू नकोस
आई जेवायला वाढेल पण तू जेऊ नकोस
आई विचारेल तूला न जेवण्याचे कारण
तू म्हण result लागला
आईच्या डोळ्यातली निराशा बघ
बघ अभ्यासाची आठवण येते का
मग रात्र होईल, झोपी जाण्याचा प्रयत्न कर
झोप येणार नाहीच, semister भर केलेला timepass आठव
बघ अभ्यासाची आठवण येते का
सकाळी लवकर उठ, न बोलताच college ला जा
पाहिलं lecture कर ,दुसर lecture करू नकोस
सरळ canteen मध्ये जा cigarette पी
बसून राहा lecture संपेपर्यंत
मग मित्र येतील त्यांना congrats कर
त्यांचा आनंदात दुःखं विसरता येत का बघ
बघ अभ्यासाची आठवण येते का
तडक उठ library त जा, एखादं पुस्तक घे
अभ्यासाचा निश्चय कर, पण फक्त index वाच
आता पुस्तक परत ठेवून दे
बघ अभ्यासाची आठवण येते का
येत्या semister मध्ये एक दिवस तरी
बघ अभ्यासाची आठवण येते का !!!

ho i loved all the poems....very much emotional n intense...khuppp chan ...cldnt stop to comment...
ReplyDeletethey r superb,flawless,fantabulous!!!